आमदार किसन कथोरे कार अपघातात २ जणांच्या मृत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता

दहागाव जवळ भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या मालकीची असलेल्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वारसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी आमदारांचा कार चालक असलेल्या आरोपीला अटक केली. मात्र सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता काही तासातच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मुरबाड (प्रफुल्ल थोरात) - कल्याण तालुक्यातील दहागाव जवळ भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या मालकीची असलेल्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वारसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी आमदारांचा कार चालक असलेल्या आरोपीला अटक केली. मात्र सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता काही तासातच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. किरण भोपी (वय. २९) असे कार चालकाचे नाव आहे. कार आणि मोटारसायकलमध्ये जोरदार धडक रविवारी संध्याकाळीच्या सुमारास दहागाव नजीक आमदार किसन कथोरे यांच्या कार आणि म...