इकडे का बसता असं बोलल्याच्या रागातून जाळल्या 5 टू व्हीलर , दोघांना अटक

बिल्डिंगच्याबाहेर  बसता असं बोलल्याच्याव त्याची तक्रार घरी केल्याने, संतप्त झालेल्या दोन भावंडांसह अल्पवयीन मुलाने पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या 5 दुचाकींना आग लावली. ही घटना उल्हासनगरात घडली असून, याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी या दोन भावांना अटक केली आहे.



उल्हासनगर - बिल्डिंगच्या बाहेर बसण्यावरून हटकल्याने व त्याची तक्रार घरी केल्याने, संतप्त झालेल्या दोन भावंडांसह अल्पवयीन मुलाने पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या 5 दुचाकींना आग लावली. ही घटना उल्हासनगरात घडली असून, याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी या दोन भावांना अटक केली आहे. रोहित नखवाल आणि पवन नखवाल अशी या आरोपींची नावे आहेत. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील 22 सेक्शन परिसरात प्रेम सागर बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या गेटसमोर तिघेजण रिक्षात बसून शनिवारी रात्री दारू पीत असल्याचा संशय एका रहिवाशाला आला. त्याने या मुलांना याबाबत जाब विचारला, मात्र ही मुले पुन्हा त्याच ठिकाणी आल्याने त्यांच्या पालकांकडे तक्रार करण्यात आली. याचा राग मनात धरून या मुलांनी पार्किंगमध्ये उभी असलेली तक्रारदाराची दुचाकी पेटवली. मात्र या दुचाकीला लागलेल्या आगीमुळे शेजारी असलेल्या अन्य 4 दुचाकीसुद्धा जळाल्या.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाजयुमो कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी कुलदीप चोप्रा याची वर्णी

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागणार!