अंबरनाथ पालिकेच्या सर्व जागा ५७ लढवणार -वंचीत बहुजन आघाडी

 समविचारी पक्षाना सोबत घेऊन लढवणार...


अंबरनाथ:-(प्रफुल्ल थोरात) अंबरनाथ नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचीत बहुजन आघाडी चे अंबरनाथ निरीक्षण डॉ जाणू मानकर  यांच्या उपस्थितीत शनिवारी अंबरनाथ येथील तोरणा गेस्टहाऊस येथे आढावा बैठक पार पाडली. यामध्ये अंबरनाथ पालिकेतील  सर्व ५७ जागा समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.




 जातीयवादी पक्षांसोबत न जाता समविचारी पक्षांना सोबत घेऊन अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक लढण्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी कॉग्रेस युती होणार का या  चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. 
नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल कधी वाजू शकते त्यामुळे ह्या आढावा बैठकीकड सर्वांचे लक्ष लागून होते. शहरातील विकास करण्यासाठी आम्ही निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे वंचीत आघाडी चे युवा नेतृत्व प्रवीण गोसावी यांनी सांगितले.
अंबरनाथ पालिकेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून युती-आघाडीच्या चर्चा सुरू होण्याची चिन्ह दिसू लागले आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे जर वंचित सोबत मिळाली तर मोठी मुसंडी महाविकास आघाडी मारू शकते. तसेच युतीचे सर्व दारे उघडे वंचीत ने केले असल्याचे डॉ जाणू मानकर यांनी सांगितले. 
जातीयवादी पक्षाने सोबत न जाता समविचारी पक्षांना सोबत घेऊन अंबरनाथ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढण्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे वंचीत बहुजन आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.या आढाव बैठकीला वंचीत अंबरनाथ  पक्ष निरीक्षक तथा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा डॉ जानु मानकर, युवा नेते प्रविण गोसावी, ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर साखरे, अविनाश गाडे, रोहित बनसोडे, संतोष कुऱ्हाडे, अशोक सुर्यवंशी, संतोष तायडे, रामदास ननावरे, कैलास डोंगरे, रवींद्र साळवे, व इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाजयुमो कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी कुलदीप चोप्रा याची वर्णी

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागणार!