भाजयुमो कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी कुलदीप चोप्रा याची वर्णी
भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी, युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी घोषित केली.
अंबरनाथ:- (प्रफुल्ल थोरात ) -आपल्या जन्म दात्या आई कडून संघाचे बाळकडू घेतलेल्या सामान्य कुटूंबातील कुलदीप चोप्रा यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे व भाजयुमो कल्याण जिल्हाअध्यक्ष मिहिर देसाई यांनी ही निवड केली. शनिवारी चोप्रा यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी कुलदीप चोप्रा म्हणाले की, आज पर्यंत केलेल्या सामाजिक कामांची दखल पक्षाने घेतली. आपल्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्ष हितासाठी काम करत युवकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे. कामाद्वारे केलेली निवड सार्थ ठरवणार असल्याचे प्रतिपादन चोप्रा यांनी केले.
त्यांच्यातल्या असलेल्या कार्यकर्त्याला भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी,पारखून भाजप सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करून जो विश्वास त्यांच्यावर दाखविला आहे,त्याबद्दल कुलदीप चोप्रा यांनीअध्यक्ष मिहिर देसाईचे आभार मानले आहेत.
पुढील काळात शशिकांत कांबळे व भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई मार्गदर्शनाखाली नवीन उपक्रम राबवून न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील असे कुलदीप चोप्रा यांनी नमूद केले आहे. तसेच एका सर्व सामान्य कुटूंबातील युवकाला भाजपाच्या जिल्हाचे काम करण्याची संधी दिल्यामुळे कल्याण जिल्हा मधील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरचिटणीस कुलदीप चोप्रा याच्या नियुक्ती मुळे अंबरनाथमधील भाजप पक्ष अधिक बळकट होण्यास मदत होईल असे पश्चिम शहराध्यक्ष राजेश कौठाळे,सरचिटणीस नरसीमलू बोलबंडा,महिला मोर्चा अध्यक्ष पूर्णिमा जाधव यांनी सांगितले