अंबरनाथच्या युवकाचे "अविरत दानयज्ञ"
YJबॉस ग्रुप सामाजिक संस्था अंबरनाथचा स्तुत्य उपक्रम
अंबरनाथ:- (प्रफुल्ल थोरात)-अंबरनाथ शहरात कुणीही उपाशी राहू नये म्हणून अन्नदान करण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था सातत्याने काम करतात. भारतीय संस्कृतीमध्ये, अन्नाचे वाटप हे नेहेमीच एक पवित्र कर्तव्य मानले गेले आहे. भारतीय उपखंडातील प्रत्येक समाजात, अन्नदानाशिवाय, किंवा प्रसाद – पूजेच्या दरम्यान अर्पण केले जाणारे खाण्याचे पदार्थ, याचे वाटप केल्याशिवाय कोणताही उत्सव किंवा कार्यक्रम पूर्ण होत नाही. हाच संस्कृतीचा वारसा उराशी बाळगून अंबरनाथ मधील YJ बॉस ग्रुप सामाजिक संस्था मधील युवक अन्नदान करत आहेत. आपल्या पॉकेट मनी मधील थोडेसे पैसे बाजूला करत तर काही तरुण पार्ट टाइम जॉब करून दररोज 10 रुपये जमा करतात.आणि दर महिन्याच्या 15 तारखेला अन्नदानाचा उपक्रम राबवतात.अंबरनाथच्या जयभीम सोसायटीला लागून असलेल्या मातोश्री कॉम्प्लेक्सच्या बाहेर अन्नदान करतात.त्या भागातील सर्वच घरातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर जेवण मिळेल तसे पाकीट बनवून घरोघरी जाऊन व मातोश्री कॉम्प्लेक्सच्या बाहेर स्टॉल लावून वाटप करतात.
गेल्या 6 महिन्यापासून हे अविरत अन्नदान युवक करत आहे.त्याच्या या उपक्रमाचे कौतुका संपूर्ण अंबरनाथ मधून केले जाते.आर पी आय नेते अजय(बॉस) जाधव यांच्या माध्यमातून ह्या युवकांना आर्थिक मदत केली जातेय .
आजच्या कोरोनाच्या महामारीत मोलमजुरी करून ऊदरनिर्वाह करणाऱ्यांची बिकट स्थिती होत आहे.त्याच प्रमाणे अंबरनाथ शहरामध्ये रेल्वे स्टेशन,बस स्टॕन्ड, भेंडीपाडा,रेल्वेस्टेशन परिसर,बुआ पाडा अशा ठिकाणी बरेच गरीब,अनाथ,गरजू लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.सतत धावणाऱ्या या अंबरनाथ शहरातील सर्वसामान्य युवक या सत्कार्यामध्ये असणारा सहभाग सातत्याने वाढवत आहे.
या उपक्रमात यश जाधव-अध्यक्ष,मयूर पाटील-उपाध्यक्ष,फारूक शेख-सचिव,राहुल साळवे-खजिनदार,फिरोज शेख,बसराज कगदोर, श्रेयस कन्हेरे, यासिन शेख,प्रथम दोंदे,साजन जाधव. यांनी हा अन्नदान उपक्रम राबवला.या अन्नदान उपक्रमात मोलाचे सहकार्य करणाऱ्या भावी नगरसेविका दीक्षा जाधव याचा सत्कार करण्यात आला.