अंबरनाथ येथील प्रेमी युगलाची रेल्वे रुळावर आत्महत्या
अंबरनाथ (प्रफुल्ल थोरात)-अंबरनाथ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खुंटवली येथील दोन प्रेमियुगलाने रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी 6 च्या दरम्यान घडली असुन संध्याकाळी ९ : ३० च्या सुमारास उघडीस आली आत्महत्या केल्याची घटना पसरताच लोकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार खुंटवलीयेथील रहीवाशी प्रीती धादवड वय 23 वर्ष रा. खुंटवली अंबरनाथ , योगेश बेंडारे(पांड्या) वय 30 वर्ष रा. खुंटवली अंबरनाथ यांनी प्रेम प्रकरणातून अंबरनाथ-बदलापूर जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जिवणयात्रा संपवल्याची घटना घडली असुन घटनास्थळावर प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा जोर धरत आहे .दोन्ही प्रमियुगल नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच प्रेम होतं मात्र घरच्या विरोधामुळे आत्महत्या केल्याच चर्चा खुंटवली भागात केली जातीय.मृत मुलांनी स्वतःला सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती.तर पुढील तपास अंबरनाथ लोहमार्ग पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहे.