मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान

 

बलात्काराच्या मुद्यावर नेमकं काय म्हणाल्या नायक?

महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. “बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.

छत्तीसगढमधील बिलासपूर येथे माध्यमांशी बोलत असताना अध्यक्षा किरणमयी नायक म्हणाल्या,”जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांनी जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, जेव्हा असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात,” असं नायक म्हणाल्या.

“अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे,” असं नायक म्हणाल्या. “बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल,” असा सल्ला त्यांनी दिला.

“सहमतीने संबंध ठेवल्यानंतर जर नातं तुटल्यानंतरच्या बहुतांश घटना आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला व पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे,”असंही नायक म्हणाल्या.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाजयुमो कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी कुलदीप चोप्रा याची वर्णी

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागणार!